गट्टे बिर्याणी
१. भात :
बासमती भात दोन वाट्या धुवुन अर्धा तास भिजुन निधळून घ्यावा. अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. शिजताना त्यात तेल १ चमचा, मीठ , तमालपत्र आणि बिर्याणी मसाला एक चमचा घालावे. भात बाजूला ठेवावा.
२. गट्टे :
एक वाटी बेसन पीठ , तेल, मीठ , तिखट, धना - जिरा पावडर घालून घट्ट मळून घ्यावे. त्याचे लांबट रोल करुन शिजवुन घ्यावेत. गार झाले की तुकडे करावेत.
३. भाज्या :
कांदा , गाजर , बटाटा यांचे मोठे तुकडे , मटार , कॉर्न
भात शिजून जितकी क्वांटीटी होईल , भाज्या - गट्टे ह्यांचीही साधारण तितकीच क्वांटिटी हवी, या बेताने गट्टे व भाज्या घ्याव्यात.
४. आले , लसूण , हिरवी मिरची ह्यांचे मिक्सरमधून वाटण करुन घ्यावे. कोथिंबीर व पुदिना थोडे पाणी घालून त्यांचेही स्वतंत्र वाटण करुन बाजूला ठेवावे.
५. कांदा , ड्राय फ्रूट्स गार्निशिंगला हवे असल्यास तळून बाजूला ठेवावे.
६. कढईत तेल घेऊन त्यात गट्टे फ्राय करुन बाजूला ठेवावेत. नंतर त्यात तेलात कांदा परतावा, इतर भाज्या घालून पुरेसे पाणी घालून एक वाफ येऊ द्यावी. त्यात बिर्याणी मसाला, मीठ व थोडे लाल तिखट घालावे. मग त्यात फ्राय केलेले गट्टेही घालावेत . मिक्सरमधली दोन्ही वाटणे घालावीत. नंतर दही घालून मिसळून घ्यावे.
७. दम देणे :
कुकरमध्ये आधी तेल / तूप घालून एक कान्द्याचा थर द्यावा . त्यावर भाजी गट्टे मिश्रण एक थर घालावा . मग भाताचा एक थर घालावा. ड्राय फ्रुट , पुदिना , कोथिंबीर अधून मधून घालावी. नंतर एक वाटी दूध शिंपडावे. कुकर बंद करुन मंद आचेवर शिजवावे.
खायच्या वेळी सगळे थर हलवून घ्यावेत.
बासमती तांदूळ , भाज्या उरल्या तर उद्या व्हेज सिझलर करावे. ( sizzler )