नाचणीचे लाडू
साहित्य -
नाचणीचे पीठ अर्धी वाटी
ओले खोबरे किसुन २ चमचे
शेंगदाण्याचा कूट ४ चमचे
गूळ गरजे नुसार
नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याची भाकरी / टिक्की करुन घ्यायची. ती तव्यावर भाजून घ्यायची.
मिक्सरमध्ये भाकरीचे तुकडे, ओले खोबरे , कूट आणि गूळ घालून मस्तपैकी फिरवावे. मिश्रण तयार होते. त्याचे लाडू बांधावेत. एखादा चमचा तूप टाकल्यास चालेल.
वेलची, ड्राय फ्रूट , तीळ , भाजलेली मेथीदाणे एखादा चमचा , खजूर इ इ इ अॅड करता येईल.
नाचणीच्या पिठाच्या लाडवाच्या अनेक पद्धती दिसतात. पीठ भाजणे, त्यात गूळाचा पाक करुन घालणे. गुळाच्या पाकात नाचणी पीठ घालून तव्यावर गोळा करणे . इ इ
ही पद्धत त्यातल्या त्यात एकदमच सोपी वाटली.
नाचणीच्या पिठाचे तिखट पदार्थ ( डोसे, उत्तप्पा, उपमा, भाकरी, थालीपीठ इ इ ) गरम असतानाच खायला चांगले वाटतात. त्यामुळे त्याना स्टोरेज लाइफ नाही. हे लाडू दोन चार दिवस तरी टिकु शकतील.