फुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती
का म्हणून दिवसेंदिवस लेखकच बनत जावे ?
का म्हणून आपणच सारं मिपावर उधळावे ?
थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी काठी नि छोटासा आरसा दिसेल
तो हातात घेऊन बसलेला एक साधा वाचक दिसेल
एक दिवस तरी साधा वाचक बनून बघावे
खुद्धु खुद्धु म्हणून हसावे
न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे
रुसेल त्याचे फुगवे निपटावे
शांत निवांत राहून धागे वाचावे
साधा वाचक जे जे करतो ते ते मनापासून करावे
खदखदून खदखदून हसावे
विरोधकांनी पण तोंडात बोट घालावे
इतके साऱ्या धाग्यावर मौनावे
रमत गमत खफवर फिरावे
हम, तुम झुम करत टिचक्या मारावे
एखादा धागा वाचून प्रतिसादावे न हळूच निसटावे
का फक्त आत्मप्रौढी ने स्वधाग्यातच रमावे
साधा वाचक बनावे अन खुशाल मोकळेढाकळे रहावे
****************
त्रस्त हा वनवास आहे!
काय हाही त्रास आहे ?
काव्य अन अर्थ जोडा
काय कटकट त्रास आहे
छान! सुंदर! कवी म्हणती
मत तुझे मज पास आहे
वीर मोठ्या मनाचा तू
खंत वाचकांस आहे
साहसा , अविचल, सबुरी
आपुला इतिहास आहे
रांधली असतेच भाकरी
पण पिझ्झा फर्मास आहे
अनेकदा मिळतो म्हणे, पण
जन्म वाचकांचा त्रास आहे
मस्त हा अधिकमास आहे!
काय हाही त्रास आहे ?
शुभाशीर्वाद आमचे स्नेही रा रा बिरूटे पंचारिष्ट