परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच! कुरमुरे मुरमुरे न्हवे. कोल्हापूरकडचे चिरमुरे गोल आणि टपोरे मोठे असतात. त्यामुळे चिंचेच्या चटणीत भिजून लगेच मऊ होत नाहीत)
आधी भडंगाची पाकु पाहू
कोल्हापुरी चिरमुरे 2 पिशव्यया
1 गड्डी लसूण ठेचून
1 वाटी शेम्गदाने
15-20 पाने ताजा कडीपत्ता
1 वाटी पिठीसाखर
4 चमचे मिर्चीपुड
2 चमचे मेतकूट
फोडणीसाठी
1 वाटी तेल
हळद, हिंग,जिरे,मोहरी
भडंग
फोडणी
भडंग
तेल तापू द्यावे आच माध्यम करून त्यात शेंगदाणे घालावेत मग मोहरी,जिरे,हिंग, हळद घालावी. लगेच कडीपत्ता व लसूण घालून परतावे. आता तिखट, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करून शेवटी मेतकूट टाकून फोडणी हलवावी. चिरमुरे घालून चनगले एकजीव करावे.
आता चिंचेचा कोळ बनवू -
1 वाटी चिंच
1 वाटी गुळ
3 चमचे साखर
1 चमचा तिखटपुड
1 चमचा पाणीपुरी मसाला
मीठ
चिंच,गूळ, साखर व तिखट घालून 7-8 मिनिटे उकळावे.
थंड झाल्यावर चुरून चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात मीठ व पाणीपुरी मसाला घाला
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
1 टोमॅटो, कांदा, बारीक चिरून
फारसाण(यात गाठी व पापडी जास्त)
कोथिंबीर भरपूर बारीक कापून
कोळ
वाफावलेली मिरची व कैरी
1 बाउल भडंग
कृती-
भडंग, त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, व शेवटी चिंचेचा कोळ टाकून चमच्याने फटाफट हलवा. मग ही भेळ एका डिश मध्ये काढून त्यावर बारीक शेव टाका. बाजूला दोन मिरच्या आणि एक कैरीची फोड ठेवा. आणि मारा कि ताव
भेळ
भेळ
भेळ