भिती तुझ्याउरी पण,उमजे तुलाच नाही.
या अवसानाचा,का भार व्यर्थ घ्यावा?
धाग्यात मांडताना,कुंठते निवांत मती.
या मूढ तारस्वरांचा , सांग काय बोध घ्यावा?
फेके जिव्हारी तूही , दुसराही परजे भाला .
मधल्या वाचकांचा, असा काय अपराध देवा?
सोडून नेक वाट,चळते बुद्धी जराशी.
मग अशांत त्या मिपाशी,कोठून नूर यावा?
जमले मिपावरी हे, गोंगाट भाट सारे.
नाहिरे कसे म्हणू मी? का नुसताचं स्वार्थ पहावा!
आता मौनवदनी, सोडून देतं आहे.
विझली फुण्गी जरी ही,नित-मात्र दक्ष पहारा!
मोडून काय लाभे? तारेत क्षणभराचे.
हे मोजकेच आहे, लागला (तरच ) अर्थ घ्यावा.
थांबवू कसातरी मग मी? या नित्य अधोगतीला?
त्या सुज्ञ मिपाकरांनी,आता विचार घ्यावा.
___-----------
विडंबन साठी गीत अर्थात बुवांच असलं तरी जखम आधिच्या विखारी धाग्यांची आहे
नाखु वाचकांचीही पत्रेवाला