प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे...
नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?
नम्मूचे विमान किती भारी... भारी
फिरतंय तेही दुनिया सारी... सारी
दुनियेचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!
नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?
नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा
आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा
गोट्याचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!
नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?
नम्मूला आवडे पुरण पोळी... पोळी
पण भलत्याच महाग झाल्या डाळी... डाळी
डाळीचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!
नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?
नम्मू हैराण झाला कैसा... कैसा
परत येईना काळा पैसा... पैसा
पैशाचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!
नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?