डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.
वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.
बहुतांश लोक या नशेसाठीच मिपावर येतात, (असे माझे निरिक्षण.) .सदस्यत्व टिकेपर्यंत ह्या नशेत राहण्यामागे, डू-आय-डी-वादा नुसार काही कारणही असेल .मला याचे विश्लेषण करत बसायचे नाही.
नेहमीप्रमाणे, दर शनिवारी संध्याकाळ उलटल्यानंतर, मी आमच्या स्वतःच्या ३-१३-१७६० ग्रहावर गेलो होतो.
कुठली तरी वेळ होती, तिन्ही सुर्य आणि १७ चंद्र आणि १७०४ उपग्रह आपापल्या जागी स्थानापन्न होत होते. (उरलेले ५६ संपावर होते. आमच्या ग्रहावर कुणीही कधीही संप करू शकतो.एकदा तर तिन्ही सूर्य पण संपावर गेले होते.तिथल्या संपांविषयी परत कधीतरी)
जवळपास सगळे ग्रह एकाच वेळी आकाशात असल्याने, मधल्या सूट्टीत शाळेत जितकी शांतता असायची तितकीच शांतता होती.(सगळे सूर्य-चंद्र आणि उपग्रह आपापसात बोलतात.) अश्या वेळी काहीही प्रश्न त्यांना (सूर्य-चंद्र-उपग्रह) पडतात.(आमच्या गुरुंच्या कृपेने आम्ही सुक्ष्मात गेलो की, सगळ्या ब्रह्मांडाचे आम्हाला ज्ञान होते.)
त्यांनी विचारले, हे मिपाकरांचे वाद-प्रतिवाद,ते मुळात अस्तित्वात का आहे? उगाचच्या वादासाठी, धागे काढणे मान्य केले तरी, मूद्दाम वाद घालण्यासाठीच येणार्या आय-डींचे अस्तित्व मान्य केले तरी, सकल मिपाकरां मध्ये ते पण आहेतच की.हे सगळं काय आहे?
अनेक विभाग आहेत, अनेक धागे आहेत, अनेक फुकाचे वाद -विवाद आहेत, मला तरी त्यांच्या लिंका देण्यात रस नाही.पण ह्या उगाच वाद घालण्याचे रहस्य काय? या प्रश्नाने विचलीत व्हायला झाले.
why is there nothing rather than something?????????
खरेतर हा अतिशय सोपा प्रश्र्न, ह्या पेक्षा पण जटिल प्रश्र्न आमच्या सौ. विचारतात? (आमच्या सौ.ची नजर फार तीक्ष्ण आहे.केवळ शर्टाला येणार्या वासावरून, ती आम्ही आमची संध्याकाळ कुठल्या मठात साजरी केली, ते पण आणि जोडीला कोण होते? ते पण....)
थोडा अभ्यास केल्यावर लक्षांत आले की, इथेच एका मिपाकराने ह्या प्रश्र्नाचे उत्तर देवून ठेवले आहे. http://www.misalpav.com/node/28625, (आमचे मिपाकर फारच हूषार, प्रश्र्नांच्या आधीच उत्तर देतात,.)
जगातील सगळ्यात सोपा असा हा प्रश्र्न. सारासार विचार सरणी आणि अहं ब्रह्मास्मी, हे एकमेकांपासून दूर झाले की मग फुकाचे वाद-विवाद होतात.कुठलाही विचार न करता, अविचाराने प्रतिसाद दिला की हे वाद-विवाद होतात. (थोडक्यात माझ्यासारखा, मेंदू बाजूला सारा आणि लिहा.)
ज्ञान आणि अज्ञान म्हणजे तरी नक्की काय?
तर काहीच नाही, जे आपण लिहिले आहे तेच खरे ज्ञान. मग इतरांनी कितीही लिंका दिल्या तरी, आपण जे लिहिले आहे तेच सत्य.(आम्ही आईनस्टाइनला पण सापेक्षता वाद शिकवू आणि न्युटनला गुरुत्वाकर्षणाचे नियम..... आणि माघार घ्यायची वेळ आलीच तर ३-१३-१७६० ग्रहावरच्या नियमांच्या आधारे चर्चा करत होतो, असे म्हणावे.)
मिपाकरांना तसा कुठलाच विषय वर्ज्य नाही आणि इथे काही जण तर फारच सर्वज्ञ आहेत. ह्या निवडणूकीत कोण जिंकणार? ते हिंदी सिनेमातला सगळ्यात वाईट सिनेमा कोणता? महान की बैराग की जॉन जॉनी जनार्दन? ह्यावर पण चर्चा होवू शकते.
फावला वेळ आणि प्रतिसादकर्ता आणि धागाकर्ता ह्यांचे (अति) ज्ञान ह्यामुळेच बर्याच चर्चा शतक गाठतात.
पण फुकाच्या वाद-विवादांचा आपल्यावर खूप पगडा असल्याने "nothing from nothing" हे वाद-विवाद करणारे कधीच मान्य करत नाहीत.
आपण कोण? आपले ज्ञान ते किती? आपली वैचारीक भुमिका नक्की कोणती? अशा मुलभूत प्रश्र्नांपेक्षा, हे वाद-विवाद मला फार आकर्षित करतात.
कदाचीत"why is there nothing rather than something ???????" या प्रश्नाचर काहीतरी नक्कीच सापडेल. ह्यावर भरपूर अनावश्यक वाद-विवाद केल्यास आपला मिपाधर्म सत्कारणी लागेलच. मिपाकर कुठल्याही धाग्यावर चर्चा करू शकतात, हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे.
१. why is there nothing rather than something ??????? ह्याचे उत्तर प्रत्येक मिपाकराकडे असेलच ह्याची खात्री.
२. शून्य वाद-विवाद असलेले मिपा धागे, शक्य आहेतच असे आपल्याला वाटते का?
३. ह्या प्रश्र्नाची उत्तरे आपल्याला माहीत आहेत का? उत्तरे माहीत नसल्यास, तुमच्या धागाकर्त्याच्या, प्रतिसादकर्त्याच्या आणि वाचक म्हणून भुमिकेवर ह्याचा प्रभाव पडला असेलच.
सर्व वाचकांचे, प्रतिसाद देणार्यांचे आणि नुसतेच स्वलेख टाकून इतर धाग्यांना प्रतिसाद न देणार्या, अशा सर्वांचे आगावू धन्यवाद..