====================
कांदा आणि कैरीची चटणी
====================
साहित्य
- दोन मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
- अर्धी कैरी (कमी आंबट आणि लहान असेल तर पूर्ण )साल काढून चिरलेली
- हिरव्या मिरच्या ५-६
- चिरलेली कोथिंबीर अर्धा कप
- लसूण पाकळ्या २-३
- तेल २-३ चमचे
- गूळ चार चमचे
- हिंग चिमुट भर
- पाव चमचा मेथीचे दाणे
- जिरे एक चमचा
- ओवा पाव चमचा
- मोहरी फोडणी पुरती
- कढीपत्ता ५-६ पाने
- मिठ चवीनुसार
- तव्यावर थोडेसे तेल घालून हिरव्या मिरच्या परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
- त्याच तव्यात मेथीचे दाणे, जिरे, लसूण्, हिंग हलकेसे परतून घ्या आणि बाजूला काढून घ्या
- ग्राइंडर मध्ये प्रथम कोरडे पदार्थ आणि नंतर चिरलेला कांदा, साल काढलेल्या कैरीच्या फोडी, कोथिंबीर, गूळ,घालून सरबरीत वाटून घ्या
- चवीनुसार मिठ टाकून परत एकदा वाटून घ्या
- बाउल किंवा वाटीमध्ये चटणी काढून घ्या.
- छोट्या कढी मध्ये फोडणी करा, त्यात मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी थंड होउ द्या. हळद घालू नका रंग संगती बिघडते
- थंड झालेली फोडणी चटणी वर टाका
- झाली चटणी तयार.
- मिरचीची देठे कांद्याची साले, कैरीची साले ओल्या कचर्याच्या डब्यात टाका
- मिक्सरची भांडी सुरी किंवा विळी व्यवस्थित स्वच्छ धुवुन ठेवा
- फोडणिचे भाडे आणि तवा जागच्या जागी घासायला ठेवा.
- ओटा चकाचक करा
कृती (१) साधारण अर्धा तास
======================================
कृती (२) साधारण पंधरा मिनीटे
ही कृती पुरूष करत असतील तर सर्वात महत्त्वाची तुम्हाला खरा आदर या मुळेच मिळेल ( एंड टू एंड प्रोसेस)
एंजॉय अँड बी हॅपी.
=========================================