साहित्य
१/२ किलो चिकन च्या तंगड्या (स्किन काढून)
६ ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१/२ इंच आलं, बारीक चिरून
२ मोठे चमचे डार्क सोया साँस
३ मोठे चमचे मध
१५ ते २० काळेमिरी, जाडसर कुटून
१ चमचा ब्लॅक पेपर साँस (मी हा वापरतो, चिंग'स)
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
१ मोठा चमचा तेल
कृती
चिकन च्या तंगड्या ब्राइन करून घ्या. [हॉट ब्राईन करत असाल तर काळीमिरी सुद्धा घालू शकता] ब्रायनिंग बद्दल इथे वाचा. तंगड्या स्वछ धुवून, त्यांना चिरा मारून घ्या. बाकीचे जिन्नस मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. चिकनच्या तंगड्या ह्या मिश्रणात साधारण १ ते २ तास मॅरीनेट करत ठेवा.
ओव्हन १८० डिग्री ला प्री-हिट करून ठेवा. एका पॅन मध्ये चिकनच्या तंगड्या ३ ते ४ मिनिटे मोठ्या आचेवर भाजून घ्या. [ह्याला searing म्हणतात. ह्याने चिकन वरून छान कुरकुरीत होईल, आणि नंतर ओव्हन मध्ये छान आतून मऊसूद शिजेल]. भाजताना तंगड्या सगळ्या बाजूने भाजून घ्या. हे करताना आपला मसाला घट्ट व्हायला लागेल, तो तंगड्यांना सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्या.
आता गॅस बंद करून, तंगड्या बेकिंग ट्रे वर (फॉईल लावून) ठेवा आणि ओव्हन मध्ये १० ते १२ मिनिटे शिजेस्तोवर भाजून घ्या (तंगडीच्या सर्वात जास्ती जाड मासल भागात सूरी किंवा टूथपिक घालून तपासा). गरम गरम खायला घ्या!