वरपरीक्षा
...........................
नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो
कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो
*
होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो
वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो
*
अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो
बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो
*
बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त
सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त
*
आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे
येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे
*
येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे
वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे
*
नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे?
नागीण बीन वाजवता, गारुड्याने का डुलावे?
काव्यरस