दोन मिंटात पाताळेश्वर गाठी
तीन ढेंगात आम्चे आगोबा..
सुकांताचे ताट आमरसही दाट
न चुकता प्रत्येक कट्टा..
तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत
ज्ञानाचा तर नित्य धबधबा..
लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो
दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा
गुरजींकडे जाती घेऊन हाती
दहा किलोचा पावभाजीसाठी डबा..
सुकांती आहार सतत (लेणी)विहार
आरोग्याचा मंत्र आगोबा..
निरागसतेचा पुतळा जणू हा
बुवांना पिडणे हाच मनसुबा ..
......... सालसकुमार दातपाडे