वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते.
असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत.
तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही. जर असा संबंध आहे असे कोणाला वाटले तर तो केवळ योगायोग आहे असे समजून तो विषय तिकडेच सोडून द्यावा व कवितेचा आनंद लुटावा.
मोठ्या वहिनीच्या बहिणी बरोबर सगळ्या होतकरु तरुणांना जवळीक साधायची असते. अनेक हिंदी सिनेमातुन झालेल्या संस्कारातून निर्माण झालेली ही परंपरा आहे. अशाच एका संस्कारी कुटूंबातील एका तरुणीचे मनोगत या कवितेत मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्या नंतर शेवटच्या काही कडव्यांमधे एका संस्कारक्षम व परंपरा जपणार्या होतकरु तरुणाचे मनोगत आहे. आशा आहे ही कविता तुम्हाला नक्की आवडेल.
ती.......
ताई दीर तुझा गं वेडा, -२
बाई गं, मुलींना मारतो खडा
मोठा याच्या खोड्यांचा पाढा,
बाई गं, मुलींना मारतो खडा ||धृ||
ल ल्ल ला लै लै लै लै ला ल ला -२
चिंचा आणायाला, मी पाठवला त्याला ,
खुळ्या सारखा खजुर घेउन तो आला
डचमळले मला, तर वाटून काळाजी,
कलिंगड आणले, त्याने लिंबा ऐवजी
वेडा आहे बाई तो थोडा, -२
बाई गं, मुलींना मारतो खडा ||१||
मी म्हणाले त्याला, आण थोडेसे ताक,
बावळट घेउन आला, गं साखरेचा पाक,
अणाया धाडले, मी अंबट काही,
बाजारातुन घेउन, तो आला मिठाई,
ओय ओय ओय ओय
बनतो येडा खाउन तो पेढा,
बाई गं, मुलींना मारतो खडा ||२||
तो.....
वहिनी तुझ्या बहिणीस नमस्कार,
सध्याचे, मुलांचे दिवस बेकार
देवा काही कर रे चमत्कार,
सध्याचे, मुलांचे दिवस बेकार ||ध्रु||
राप पा, तुरु तुरु तुरु तुरु ता ररा -२
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले,
क्षमस्व मला, मर्म नाही समजले
शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल ,
दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
होईल केव्हा मला सा़क्षात्कार,
सध्याचे, मुलांचे दिवस बेकार,||३||
----(फुटकळ सुपारीबाज कवी) पैजारबुवा,----